महिला सामाजिक कार्यकर्त्यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित


अहेरी:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ग्राम पंचायत स्तरावर उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिला मीना मडावी अंगणवाडी सेविका आणि जयश्री आत्राम ग्राम पंचायत सदस्य तथा महिला बचत गट संयोगिनी यांचा शाल, श्रीफळ ,सन्मानपत्र व रक्कम आणि गौरवचिन्ह सरपंच सरोजा पेंदाम यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्याचे घोषणा करण्यात आले त्या निमित्ताने ग्राम पंचायत तिमरम च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी चे औचित्य साधून सन्मान सोहळा साजरा करण्यात आले या वेळी सचिव एस. एस. सडमेक, सरपंच सरोजा पेंदाम, उपसरपंच प्रफुल नागुलवार, ग्रा. प. सदस्य श्रीकांत पेंदाम, दिवाकर गावडे, रुपेश आत्राम, घननीळा ओनपकला,शोभा सिडाम माजी ग्रा. प.सदस्य रविंद्र मडावी, कैलास आत्राम, अक्षय सडमेक, शिपाई श्रीनिवास आईलवार, शिपाई विलास मडावी,संगणक चालक तिरुपती डोंगरे, ग्रामसभा मोबिलायझर सपना सिडाम, अनुसूर्या सडमेक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post