अहेरी राजनगरीत होणार भव्यदिव्य असे बौद्ध विहार, अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी नवीन बौद्ध विहार बांधकामासाठी 500000/-(पाच लाख) रुपयांची केली आर्थिक मदत


गडचिरोली :- जिल्ह्यातील राजनगरी अहेरी येथे जुने जीर्ण बुद्ध विहार पाडून भव्यदिव्य असे नवीन बौद्ध विहार बांधकाम करण्यासाठी स्थानिक अहेरी येथील  बौद्ध समाज बांधवांना आर्थिक मदतीची गरज भासत होती, ही बाब अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कानी पडताच त्यांनी स्थानिक अहेरी येथील बौद्ध समाज बांधवांना भेटून त्यांच्याशी आस्थेने संवाद साधत त्यांची समस्या आणि त्यांच्या अडचनी जाणून घेतल्या व त्यांना अहेरी राजनगरीत भव्यदिव्य असं सुंदर बौद्ध विहार बांधकाम करण्यासाठी  500000/-(पाच लाख) रुपयाची आर्थिक मदत केली.
आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना गौतम बौद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा या बौद्ध विहारातून मिळावी आणि आजच्या युवा पिढीमध्ये संस्कार वाढावे आणि आजचा युवा हा आपलं भविष्य आदर्श व्यक्ती म्हणून समाजात जगेलं,या उद्देशाने हा बौद्ध विहार एक केंद्र बिंदू बनेल,असे मत यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व दानशूर राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले बौद्ध विहारातून चांगले कार्य बौद्ध समाजात घडावे आणि आजच्या युवा पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बौद्ध यांचे विचार आपल्यात रुजवावे आणि आपली प्रगती करावी,आपलं उज्वल भविष्य बनवावे आणि आपल्या देशाचं नाव,आपल्या राज्याचं नाव व आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक करावे असे मत यावेळी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील बौद्ध समाज बांधवांना बोलून दाखवले आणि आपण सदैव आपल्या सोबत आहोत असे ते बौद्ध समाज बांधवांना म्हणाले.
ह्यावेळी बौद्ध समाज ज्ञान प्रसारक युवक मंडळ अहेरीचे अध्यक्ष  श्री.एकनाथ चांदेकर, सहसचिव प्रशांत भीमटे, संजय ओंडरे,रमेश अलोने, मारोती ओंडरे, तिरुपती चालूरकर, रोहीत ओंडरे,परशुराम दहागांवकर तसेच स्त्री सदस्य म्हणून सौ.कमलाबाई ओंडरे, शोभाताई भीमटे, कमलताई अलोने, प्रफुता ढोलगे, लताताई ओंडरे, सरिताताई अलोने, रसिकाताई दहागांवकर, मायाताई दुर्गे, माधुरीताई माउलीकर,भारतीताई ओंडरे, दिव्याताई अलोने, शकुन अलोने उमाताई चल्लूरकर, गंगासागर कांबडे, निर्मला दुर्गे, सुगणाबाई दुर्गे, इत्यादी अहेरी येथील बौद्ध समाज बांधव,गावकरी व महिला वर्ग  मोठया संख्येने उपस्थित होते..!! ☝️👇

Post a Comment

Previous Post Next Post