दारुड्या पतीने पत्नीचा ब्लेडने गळा चिरला !




पोलिसांच्या सतर्कतेने वाचला जीव

चंद्रपूर: विरुर स्टेशन आपल्या घरातून पैसे आणल्याच्या कारणावरून दारुड्या पतीने पत्नी माहेरी असताना तिथे जाऊन तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास नवेगाव येथे घडली.

राजुरा तालुक्यातील अन्नूर येथील जोगेश्वर गणपत सिडाम याचा मागील काही वर्षापूर्वी विवाह झाला होता. पण तो सतत मद्द प्राशन करीत असल्यामुळे पहिली पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या माहेरी निघून गेली, नंतर त्याने २०२० मध्ये नवेगाव येथील रोशनीशी प्रेमविवाह केला व अन्नूर येथे राहत असताना तिचा दारूच्या नशेत मानसिक छळ करू लागला. त्यामुळे तीदेखील पतीला सोडून आपल्या माहेरगावी नवेगाव येथे आईकडे राहत होती. अशातच रविवारी रात्री जोगेश्वरने नवेगाव येथे जाऊन रोशनीच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली. तिला आधी राजुरा येथे व नंतर चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविले.

मद्यपी जोगेश्वर सिडाम हा सतत मद्यप्राशन करून पोलिस प्रशासनाच्या ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर विनाकारण काल करून दिशाभूल करीत होता. घटनेच्या दिवशीही त्याने ११२ वर कॉल केला. याची माहिती विरुर पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल हे आपल्या ताफ्यासह नवेगाव येथे पोहोचले. आरोपी जोगेश्वर गणपत सिडाम याने आपल्या हातातील ब्लेडने पत्नी फिर्यादी रोशनीच्या गळ्यावर बेल्ड मारून गंभीर जखमी केल्याचे दिसून आले. तत्काळ पोलिसांनी जखमी महिलेस उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी सदर महिलेस चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले व आरोपी जोगेश्वर गणपत सिडाम (४९) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, पोलिस उपनि रीक्षक सचिन मडावी, माणिक वाग्धरकर, कुळसंगे, नर्गेवार, भगवान मुंडे, स्वप्निल चांदेकर, अतुल शहारे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post