अहेरीचे सेन्साई रवि भांदककार यांची "जागतीक मास्टर्स गोल्डन अवार्ड" लंडन करीता निवड


   अहेरी:-   स्थानिक नगरपचांयतचे स्वच्छता दुत  तथा जागतीक मास्टर्स कराटे विजेता व जागतीक मास्टर्स पुरस्कार -22 थायलंड, बँकाॅक प्राप्त अहेरीचे सेन्साई रवि भांदककार यांची जागतीक मास्टर्स गोल्डन अवार्ड -2023 पुरस्कार करीता जागतिक मार्शल आर्ट कराटे संघटनेने नुकतीच निवड केली आहे.
       निवडीचे मेल व पत्र दि.06 जूनला प्राप्त झाले. ज्यात सम्पुर्ण भारतातुन 22 लोकांची निवड झाली आहे. ज्यात  महाराष्ट्रमधील अहेरिचे सेन्साई रवि भांदककार यांचे नाव आहे. ही  अतिशय गर्वाची बाब आहे.
       सदरची निवड वर्ल्ड मिक्स मार्शल आर्टचे अध्यक्ष तथा ग्रँन्डमास्टर व ईटंरनॅशनल आँल्मपीक कमीटीचे सदस्य मा.निसार सिमीलर  व वर्ल्ड तायकांडो फेडरेशनचे ग्रँन्डमास्टर भारतीय चिफ  डाॅ.शिवा कुमार रामलिगंम  अहमदाबाद  यांच्या विशेष निवड समितीच्या पडताळणी संघा व्दारे निवड करण्यात आली. 
    संम्पुर्ण भारतीय पुरस्कार विजेते तथा जागतीक कराटे सेमीनार करीता भारतीय संघ दिनांक 22 जुलै  2023 ला चेन्नई विमानतळावरुन लंडन ( युके) ईग्लडं करीता रवाना होणार आहेत. यात विशेष म्हणजे सर्व पुरस्कर्ते याच्या अर्धांगिनीना  देखील घेऊन येण्यास परवानगी देऊन आमंत्रीत केले आहे. तेव्हा त्याच्यां सोबत त्याच्यां सहचारीणी सौ.किरण रवि भांदककार हे देखील सोबत जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे. 
सेन्साई रवि भांदककार  हे आतंरराष्ट्रीय दर्जाची अँलनतिलक शितो-रियु ईटंरनॅशनल स्कुलचे विध्यार्थी असुन ते स्व.दाईसेन्साई डाॅ.मोसेस तिलक यांचे शिष्य आहेत. त्यानां सध्या भारतीय प्रमुख डाॅ.निल मोसेस तिलक  कोईम्बतुर व सेन्साई अरविदं पाटील  नागपुर  यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तेव्हा पुन्हा एकदा अहेरी, विदर्भाचा डंका थायलंड,मलेशिया नंतर लंडन  मध्ये वाजणार असल्याने अहेरीचे सुपुत्र व जागतीक मास्टर्स कराटे विजेते व ब्रँन्ड अम्बेसिटर अहेरी नगर पचांयत यांचे सार्वत्रीक अभिनंदन करुन सर्व अहेरीकर , व समस्त मित्र परीवार आणि सर्व मार्गदर्शकनी सेन्साई रवि भांदककार  यानां पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा प्रदान केल्या आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post