तुम्हाला आधीच कळणार वीज कुठे पडणार ‘दामिनी’ ॲप करणार अलर्ट

गडचिरोली : मान्सूनच्या कालावधीत, विशेषत: जून व जुलै महिन्यात वीज पडून जिवीत हाणी होण्याच्या घटना होत असतात. विजेमुळे जिवित हानी होऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने “दामिनी” ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सदर ॲप जीपीएस लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.
सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणा, नागरिक, क्षेत्रिय अधिकारी/मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, महसुल कर्मचारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी , ग्रामसेवक , कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांनी सदर ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे वीजेच्या कडकडाटाबद्दलची स्थिती कळून वेळीच सावध होण्यास मदत होणार आहे.
या ॲपमध्ये सभोवतालच्या भागात वीज पडत असल्याचे दर्शविते. त्यामुळे सुरक्षित स्थळी जाणे शक्य होते. गावातील सर्व स्थानिक शासकीय, अधिकारी/ कर्मचारी यांना सदर अॅप डाऊनलोड केल्यास त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्टनुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरीकांना देणे शक्य होते. यामुळे होणारी संभावित जिवितहानी टाळण्याचा प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे

Post a Comment

Previous Post Next Post