सासऱ्याने केली सुनेची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या




चारित्र्यावर संशय 

आरोपीने केले पोलिसात आत्मसमर्पण

भंडारा : सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासऱ्याने सूनेची कुन्हाडीने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. १६) सकाळी १० वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहना गावात घडली. प्रणाली सतीश ईश्वरकर (२४) असे मृत सुनेचे नाव आहे. सुनेची हत्या करून तिचा मृतदेह घरातील अंगणात कापडाने झाकून ठेवत सासऱ्याने मोहाडी पोलिसात आत्मसमर्पण केले.

या धक्कादायक हत्या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी बळवंत ईश्वरकर (५७) असे गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपी सासऱ्याचे नाव आहे.

आरोपी सासरा यांच्या पत्नीचे निधन झाले असून ते मुलगा, सून आणि एका नातवासह रोहना गावातील घरी राहत होते. मात्र, सासरा बळवंत सून प्रणाली हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे घरात सासरा आणि सून यांच्यात वाद होत होता.

Post a Comment

Previous Post Next Post