नदीत खेकडे पकडण्यासाठी गेले अन् विद्यार्थी बुडून


दिनांक:-08/07/2023
गावाशेजारी असलेल्या वर्धा नदीत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पाचव्या वर्गातील तिन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना दिनांक 8 जुलै शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यांतील तोहोगाव येथे घडली.


प्रतिक नेताजी जूनघरे वय 11 निर्दोष ईश्वर रंगारी वय 11 बन्नी सुरेश रायपुरे वय 11 रा. तोहोगाव अशी मृत मुलांची नावे आहेत

शाळा सुटल्यानंतर दुपारच्या सुमारास पाचव्या वर्गातील ही चार मित्र वर्धा नदित खेकडे पकडण्यासाठी गेले असता प्रतिक, निर्दोष आणी बन्नी हे तिघे जण पाण्यात उतरले तर एक मित्र. बाहेर उभा होता. हे तिघेही जण पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडाले याची माहिती बाहेर उभ्या असलेल्या मित्राने गावात येवून सांगितली. या तिघांचे मृतदेह अद्याप सापडला नसुन याचा शोध सुरू आहे.पण आज प्रतिक नेताजी जूनघरे या मुलाचा प्रेत मिळाला आहे.

 या घटनेने तोहोगाव या गावावर शोककळा पसरली असून मृतक मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post