पोळ्यासाठी शहरात आलेली साडेतीन लाखांची दारू जप्त जीप ताब्यात दोघांवर गुन्हा दाखल





 गडचिरोली : पोळ्याच्या सणानिमित्त बंदी असतानाही दारूची तस्करी होते. मात्र, येथील पोलिसांनी पोळ्यासाठी आलेली साडेतीन लाख रुपयांची दारू जप्त करून, तस्करांचा डाव उधळून लावला. शहरातील कॅम्प परिसरात जीप ताब्यात घेतली. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली.

राकेश इटकरवार (रा.गुरवळा (राखी), सचिन येनप्रेडीवार (रा. गडचिरोली) अशी आरोपींची नावे आहेत. पोळा सणाला मद्यपान करण्याचे प्रमाण अधिक आहे. बंदी असतानाही छुप्या पद्धतीने दारूची

तस्करी होते. या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट होते. १२ सप्टेंबरला रात्री कॅम्प परिसरातील एका शाळेच्या मोकळ्या प्रांगणात जीप (एमएच ३३ ए- ४११) उभी असल्याची माहिती मिळाल्यावरून पो.नि.अरुण फेगडे यांनी सहकाऱ्यांसमवेत धाड टाकली. यावेळी वाहनात तीन लाख ४० हजार रुपयांची दारू आढळली. आठ लाखांच्या जीपसह एकूण ११ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

जीप मालकाचा शोध घेऊन दोघांवर गुन्हा नोंदविला. या कारवाईमुळे चोरीछुपे दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post