अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाची कारागृहात रवानगी




• चंद्रपूर, ब्युरो. येथील जिल्हा न्यायालयात बुधवारी राजुरा पोलिस ठाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला नितेश गौतम उपरे (रा. वरूर, तालुका राजुरा) या आरोपीला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.

या गुन्ह्याचे तपास अधिकारी पीएसआय भीष्मराज सोरते यांनी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.

आरोपीला विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे वतीने विधी सेवा सहाय्य पुरविण्यात आले. अॅड. विनोद बोरसे यांनी न्यायालयात आरोपीच्या वतीने वकीलपत्र दाखल केले. आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पारित झाल्याने आरोपीची कारागृहात रवानगी झाली.

Post a Comment

Previous Post Next Post