दूचाकी अपघातात ६ वर्षाची मूलगी ठार



कुरखेडाः नान्ही येथून लग्न कार्य पार पाडत वडेगांव येथे परत जाताना नान्ही-वडेगांव मार्गावरील वळणावर दूचाकी अनियंत्रित होत लहान पूलाच्या कठड्याला धडकल्याने ६ वर्षाची बालीका ठार तर दूचाकी चालक यूवक गंभीर जखमी झाल्याची घटना काल शुक्रवार रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.



वडेगांव येथील मडावी कूटूंब नान्ही येथे नातेवाईकाच्या लग्न कार्याला गेले होते. लग्न कार्य पार पाडत वाडेगावला परत येताना 
 त्यांची मूलगी माही विठ्ठल मडावी (६ वर्षे) ही नातेवाईक असलेले नितेश गावळे वय (२६) यांच्या दूचाकी क्र. एमएच ३५ ए एफ ६२४२ वर बसली होती. सदर दूचाकी वडेगांव मार्गावरील वळणावर अनियंत्रित होत लहान कठड्याला धडकल्याने चिमूकली माही ही जागीच ठार झाली तर दूचाकी चालक नितेश गावळे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post