पश्चिम बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला


वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी




कोलकाता: प बंगालमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भूपतीनगरमध्ये एनआयएच्या पथकावर जमावाकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तसेच पथकातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये एनआयएच्या पथकातील दोन अधिकारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक या ठिकाणी दाखल झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात तीन जणांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भातील तपास एनआयएकडून सुरू असून यासाठी भूपतीनगर येथेः आलेल्या पथकावर संतप्त जमावाकडून हल्ला करण्यात आला.

यावेळी दगडफेक करत अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना ६ एप्रिल रोजी पहाटे घडली. या घटनेत दोन अधिकारी जखमी झाले आहेत.

पथकावर हल्ला झालेल्या प्रकरणात पोलिसांनी काहींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.


ईडीच्या पथकावरही याआधी झाला होता हल्ला



पश्चिम बंगालमध्ये  याआधी एकदा ईडीच्या पथकावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला होता.


Post a Comment

Previous Post Next Post