अमिर्झा लगतच्या मौशीचक फाट्यालगतची घटना दुचाकीच्या धडकेत एक ठार, २ जखमी


 अमिर्झा - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज ५ एप्रिल रोजी अमिर्झा लगतच्या मौशीचक फाट्यावर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.


नामदेव सेलोटे (७०) रा. मौशी चक असे मृतकाचे नांव आहे. तर जखमीमध्ये सुधीर सेलोटे (३५) रा. मौशी चक, अनिल निलेकार (३६) रा. अमिर्झा यांचा समावेश आहे. नामदेव सेलोटे व

नातू सुधीर सेलोटे हे अमिर्झा येथील कार्यक्रम आटोपून दुचाकीने स्वगावी मौशीचककडे जात होते तर मौशी वरून अमिर्झाला अनिल निलेकार हा आपल्या दुचाकीने जात असतांना दोन्ही दुचाकींनी एकमेकांना धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला.

दोघे गंभीर जखमी झाल्याने अमिर्झा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post