'ये सच्चाई हैं' म्हणत ईव्हीएमसंबंधी स्टेटसमुळे वनकर्मचाऱ्याचे निलंबन



वन्यजीव विभागात घटना : व्हॉट्सअॅपवर संदेश भोवला





अमरावती : पांढरकवडा वन्यजीव विभागातील कार्यरत लिपिकाने मतदान यंत्रणाबाबत संशय निर्माण करणारे 'ये सच्चाई है' अशा आशयाचे व्हॉटसअॅपवर स्टेटस ठेवल्यामुळे संबंधित वनकर्मचाऱ्याला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या स्टेटसची दखल घेत आयोगाने ही कारवाई केलेली आहे. शिवशंकर मोरेअसे निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सर्वप्रथम शासकीय कर्मचाऱ्यांना पाळणे बंधनकारक असते. शासकीय कर्मचाऱ्यांना या काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठल्याही पक्षाचे समर्थन करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना कमालीचे सतर्क राहावे लागते.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागात कार्यरत लिपिक शिवशंकर प्रभू मोरे यांच्यावर निलंबनाची वेळ आली. मोरे यांना निलंबित करून पाटणबोरी वनपरिक्षेत्र कार्यालयात या काळात निर्वाह भत्ता अदा करण्यासाठी वर्ग करण्यात आले आहे.

निलंबन का ओढवले?

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. शिवशंकर प्रभू मोरे यांनी त्यांच्या मोबाइलच्या व्हॉट्सअॅपवर 'ये सच्चाई है' नावाचे स्टेटस ठेवलेले होते. ज्यामध्ये मतदान यंत्रणावर कमेंट्स पास करण्यात आल्या आहेत. ईव्हीएमवर संशय घेत खोट्या माहितीचा प्रचार या माध्यमातून केल्याचा आरोप तक्रारीत केल्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आर्णी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. ही व्यक्त्ती

कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व कायदा

माहिती तंत्रज्ञान कायदा २००० आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ व भादंवि १७१ (ग) नुसार निवडणूक संबंधाने खोटे विधान आणि असत्य लिखाण करून निवडणूक आयोगाला संशयाच्या घेऱ्यात टाकल्याने लोकसेवकाने वर्तणूक व शिस्तीचा भंग केल्यामुळे शिवशंकर मोरे यांनी नियम १९७९ (५) चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांना तत्काळ निलंबित केले आहे. तसेच त्यांच्यावर चौकशीसुद्धा उघड करण्यात आली आहे. यामुळे लोकसेवकांमध्ये दहशत पसरली आहे.



शासकीय कर्मचारी असल्याका- रणाने अशोभनीय कृत्य करून आचारसंहितेचा भंग केल्यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ नुसार मोरे यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस विभागीय वनअधिकारी उत्तर फड यांच्याकडे करण्यात आली. या शिफारशीनुसार शिवशंकर प्रभू मोरे यांना सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post