संविधानाशी एकनिष्ठ राहा' !सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा सल्ला





नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तत्पूर्वी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. वकील आणि न्यायाधीशांनी संविधानाशी एकनिष्ठ असले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तसेच, न्यायाधीशांनी पक्षपाती नसावे असेही ते म्हणाले. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या शताब्दी सोहळ्यात न्यायमूर्ती चंद्रचूड बोलत होते. यावेळी ते म्हणतात, भारतासारख्या चैतन्यशील आणि तर्कशुद्ध लोकशाही मध्ये बहुतांश लोकांचा कल कोणत्या ना कोणत्या राजकीय विचारसरणीकडे



असतो. अॅरिस्टॉटल म्हणाले होते की, मानव हा राजकीय प्राणी आहे आणि वकील याला अपवाद नाहीत. बारच्या सदस्यांनी न्यायालय आणि संविधानाबाबत पक्षपाती असू नये. 'बार कौन्सिलच्या सदस्यांना सरन्यायाधीशांचा सल्ला देशाच्या सरन्यायाधीशांनी भारताच्या न्यायव्यवस्थेवर ही महत्त्वाचे भाष्य केले. ते म्हणाले की, न्यायपालिका आपल्या स्वातंत्र्यासाठी, कार्यकारिणी, कायदेमंडळ आणि निहित राजकीय हितसंबंधांपासून अधिकार वेगळे करण्यासाठी वेळोवेळी पुढे येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post