दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकुलता एक मुलगा ठार





आष्टी : चामोर्शी तालुक्यातील येणापूर जवळील देशबंधू हिंदी हायस्कूल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन एक युवक ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

आयुष सुरेश चोखारे (१८, रा. लक्ष्मणपूर) असे मृतकाचे नाव आहे. आयुष हा आपल्या दुचाकीने येणापूरकडून चामोर्शीकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. अपघात होताच शेजारच्या लोकांनी आयुषला येणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र. प्रकृती चिंताजनक असल्याने

त्याला चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आयुषचे वडील लक्ष्मणपूर येथील पोलिस पाटील आहेत.

आयुष हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. शनिवारी सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. त्यामुळे वातावरण सुन्न झाले होते. अंत्यविधीसाठी उपस्थित नागरिकांनाही अश्रू अनावर झाले.

Post a Comment

Previous Post Next Post