35 प्रवाशी प्रवास करत असताना बसने घेतला अचानक पेट

यवतमाळ : धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे घडली. यवतमाळ जिल्ह्यातील शिळोना-फोपाळी घाटात ही घटना घडली आहे. ही एसटी बस पुसद आगाराची असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. पुसद आगाराची ही बस नांदेड करिता जात असताना बसने अचानक पेट घेतला.

एम.एच 40- 6170 क्रमांकाची पुसद आगाराची बस पुसदवरून नांदेड करीता निघाली होती. दरम्यान पोफाळीच्या शिळोणा घाटात अचानक बसच्या समोरच्या भागाला आग लागली. या बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमुळे वाहनाचा समोरचा भाग पूर्णतः जळाला आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूनी वाहतूक मोठ्या प्रमाणत विस्कळित झाली.

एसटी बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली आणि त्यानंतर गाडीतून सर्व प्रवासी, चालक, वाहक बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या घटनेत एसटी बस संपर्णपणे जळून खाक झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post