आश्चर्यचकित करणारी घटना ....अनिल भाऊला तब्बल 500 वेळा साप चावला


लातूर : लातूरमधून एक अत्यंत आश्चर्यचकित करणारी घटना समोर येत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रहिवासी अनिल तुकाराम गायकवाड यांना एक, दोन नव्हे तर तब्बल ५०० पेक्षा अधिक वेळा सर्पदंश झाल्याच समोर आलं आहे.
अनिल तुकाराम गायकवाड हे वय वर्षीय ४५ असून शेतमजुरी करत आपल्या कुटुंबाचं संगोपन करतात. ५०० वेळा सर्पदंश झाल्याचा दावा आनंद यांनी केला आहे.


आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या वेळा सर्पदंश होऊनही अनिल हा आयुष्याच्या शर्यतीत टिकून आहे. अनिल यांचं आयुष्य पूर्णपणे सापांनी घेरून टाकल्या सारखं आहे.

शेतात मजूर म्हणून काम करताना अनेक वेळा त्यांना साप चावला आहे. येवढच काय तर शहरात गर्दीत जात असताना साप त्यांना चावला होती. १० ते १५ वर्षाच्या काळात अनिल यांना किमान ५०० वेळा सर्पदंश झाला असून त्यांना अनेकवेळा ICU मध्ये दाखल करण्यात आले होते.



अनिल गायकवाड यांच्यावर डॉ. सच्चिदानंद रणदिवे यांनी १५० पेक्षा जास्त वेळा उपचार केले आहेत. डॉक्टरांनी मोठं आश्चर्य व्यक्त केलं की साप अनिल यांनाच चावतो. एकाच व्यक्तीला येवढ्या वेळा सर्पदंश होणे ही खरंच अचंबित करणारी घटना आहे.

Post a Comment

Previous Post Next Post