कोरेगाव, डार्ली आणि वडधा श्रेत्रात येणाऱ्या कृशिपंप धारकांना नियमित वीज पुरवठा सुरू ठेवा.


- वारंवार विज पुरवठा खंडित. 
- शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.
- कृशिपंप धारकांचा उपोषणाचा इशारा.
- आरमोरी विद्युत विज कंपनी ग्रामीण विभाग अभियंता यांना निवेदन.

वैरागड : - गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात येणाऱ्या कोरेगाव, डार्ली आणि वडधा श्रेत्रात येणाऱ्या कृशिपंप धारकांना नियमित विज  पुरवठा सुरू ठेवा. अशी मागणी कृशिपंप धारक शेतकरी यांनी आरमोरी विद्युत विज कंपनी ग्रामीण विभाग अभियंता यांना निवेदनातून केली आहे.


आरमोरी :- तालुक्यातील विद्युत सबडिविजन अंतर्गत येणाऱ्या कोरेगाव, डार्ली आणि वडधा श्रेत्रातील कृशिपंप धारकांना रब्बी पीक पिकविण्यासाठी 08 तास मोटरपंप सुरू ठेवण्यासाठी विद्युत विज कंपनी मार्फत विज पुरवठा केली जाते. हा विज पुरवठा दिवसातून वारंवार खंडित होत असल्याने कृशिपंप धारकांना नियमित विज पुरवठा मिळत नाही. पाण्या अभावी पिके करपत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. 

याबाबिकडे विद्युत विज कंपनीने लक्ष देऊन खंडित होणारी विज पुरवठा त्वरित सुरू करून नियमित चालू ठेवावी अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा विद्युत सबडिविजन अंतर्गत येणाऱ्या कोरेगाव, डार्ली आणि वडधा श्रेत्रातील कृशिपंप धारक जगदीश पेंद्राम, विलास जुमनाके आणि केशवराम ताडाम यांनी आरमोरी विद्युत विज कंपनी ग्रामीण विभाग अभियंता यांना निवेदनातून केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post