बापरे... चोरांनी तब्बल १९ लाख रुपये लुटले...


मूल : हार्डवेअरची वसुली करून दुचाकीने परत मूलकडे येताना अज्ञात लुटारूंनी दुचाकीवरील अक्षय गोवर्धन याला जखमी करून १९ लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला ही घटना बुधवारी रात्री ९ वाजतादरम्यान मूल - चंद्रपूर मार्गावरील डोनी फाट्याजवळ घडली . या घटनेची तक्रार मूल पोलीस ठाण्यात दिली असून , पोलीस कसून चौकशी करीत आहे . मूल येथील महालक्ष्मी हार्डवेअर कंपनीचे जिल्ह्यात हार्डवेअर सिमेंट विक्रीच्या क्षेत्रात मोठे जाळे पसरलेले सदर हार्डवेअरची वसुली करण्यासाठी सिंतळा येथील दिनेश प्रकाश चलाख व मूल येथील अक्षय गोवर्धन हे हार्डवेअरचे संचालक दिनेश गोयल यांच्या दुचाकीने ( क्रं . एमएच ३४ बी.वाय . ७२२१ ) पोंभुर्णा , बल्लारशहा , राजुरा गडचांदूर , चंद्रपूर व चिचपल्ली येथे वसुलीसाठी गेले होते . दरम्यान वसुली करून परत येत असताना चंद्रपूर मार्गावरून मोपेड मोटार सायकलने येताना दोन अज्ञात लुटारूंनी अक्षय गोवर्धन याला जखमी करून त्याच्या ताब्यातील वसुलीचे १ ९ लाख रुपये हिसकावून पळ काढला . मूल पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत .


Post a Comment

Previous Post Next Post