महिला पोलिसांनी काढली.... गुंडाची वरात

लातूर:- लातूरमध्ये महिला पोलिसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला पोलिसी खाक्या दाखवत त्याची पोलीस स्टेशनपर्यंत वरात काढली.
हा गुंड ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची ही अवस्था पोलिसांनी केल्यामुळे सर्वसामान्य लोक सुखावले होते. महिला पोलिसाच्या या फटक्यांमुळे इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.
लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात मागील काही दिवसांपासून गौस मुस्तफा सय्यद हा सराईत गुन्हेगार दशहत निर्माण करत होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 18 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

14 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीला त्याने मारहाण केली होती. त्या भागात दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीने विवेकानंद पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली.
विवेकानंद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आरोपीच्या शोधात होते. गौस मुस्तफा सय्यद हा दयानेश्वर नगर भागात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तिथे दाखल झाले. त्याला ताब्यात घेण्यात आले. परंतु या गुंडाला तिथून पोलिसांच्या गाडीतून न नेता रस्त्यावरुन चालवत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्याने या कारवाई पुढाकार घेतला होता.
गौस मुस्तफा सय्यद याला पोलिसी खाक्या दाखवतच तो रस्त्यावर गयावया करु लागला. तो ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची ही अवस्था पोलिसांनी केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुखावले होते. पोलिसांनी रस्त्यावरुन त्याची काढलेली वरात अनेकांनी पाहिली मात्र मोबाईल फोनमध्ये शूट कोणी केली नाही.
दरम्यान, दशहत निर्माण करणाऱ्या या गुंडाला महिला पोलिसाने भररस्त्यात फटके दिले आणि पोलीस स्टेशन गाठले. झालेल्या प्रकारावर त्या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अशाप्रकारे कोणी कृत्य करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिले.

Post a Comment

Previous Post Next Post