*अखेर, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाला यश, चिखलगांव रेल्वे क्रॉसिंग ते लालपुलीया वाय पाइंट पर्यंतचा रस्ता लवकरच होणार*

   वणी:- परशुराम पोटेे
चिखलगांव रेल्वे क्रॉसिंग ते लालपुलीया वाय पाइंट पर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असल्याने त्या रस्त्यावरून जातांना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालवतांना धुळीचे प्रमाण सुद्धा वाढले असून या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांनी वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे तोंडी व निवेदनाद्वारे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी दि.३ ऑक्टोबर २०२१ ला मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती यांच्याकडे पत्राद्वारे चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते लालपुलीया वाय पाइंट पर्यंतचा रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन अधिक्षक अभियंता सार्व.बां. विभाग यवतमाळ यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांना पत्र पाठवून चिखलगांव रेल्वे गेट ते बायपास वॉयपॉईंट पर्यंत डांबरीकरण करण्याची सुचना केली आहे. त्यामुळे आता चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते लालपुलीया वाय पाइंट पर्यंतचा रस्ता लवकरच डांबरीकरण करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post