मेहुण्याने केली.... जावयाची हत्या

अमरावती:- बहिणीसोबत सुरू असलेल्या घरगुती वादात उडी घेऊन मेहुण्याने जावयाला संपविल्याची Murder खळबळजनक घटना येथील ग्रामीण पोलिस वसाहतीत शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. हत्येप्रकरणी आरोपी मेहुण्याला अटक करण्यात आली आहे. अजय सुखदेव मोहोड (४६, रा. ग्रामीण पोलिस वसाहत), असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताची मुलगी नेहा हिच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी अमोल काशीनाथ जवंजाळ (३५, रा. वायगाव) याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. शनिवारी रात्रीच्या सुमारास अजय मोहोड व त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाला. तो सुरू असताना आरोपी अमोल तेथे आला. आरोपी व अजय यांच्यात ओढाताण झाली.
त्यांनी एकमेकांना मारझोड केली. त्यानंतर अमोल जवंजाळने अंगणातील लाकडी पाटी उचलुन जावई अजय यांच्या डोक्यावर मारली.पायावर देखील मारहाण Murder केली. अजय यांची मुलगी नेहा मारहाण करू नका, अशी मामाला विनवणी करीत होती. मात्र त्यानंतरही त्याने जावयाला मारहाण सुरूच ठेवली. त्यात ते बेशुद्ध झाले. शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी अजय मोहोड यांना उचलुन ऑटोमधे टाकले.तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र उपाचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. मामानेच आपल्या वडिलांना जीवानीशी ठार केले,अशी तक्रार मृताच्या मुलीने गाडगेनगरमध्ये नोंदविली आहे. घटनास्थळी डीसीपी विक्रम साळी, एसीपी पुनम पाटील व गाडगेनगरचे ठाणेदार
आसाराम चोरमले यांनी भेट दिली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post