छेड काढणाऱ्या रोड रोमियोला अद्दल घडविण्यासाठी विद्यार्थिनींनी केली दे... धुलाई



राज्यात मुलींसह महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी ते काही केल्या कमी होत नाहीय. अशातच शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.
छेड काढणाऱ्या तरुणाला अद्दल घडविण्यासाठी विद्यार्थिनींनी रणरागिणींचं रुप घेतल्याचं पाहायला मिळालं. नेहमी छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोला शाळेतील विद्यार्थिनींनी चांगलाच चोप दिला. बोदवड तालुक्यात येवती गावाजवळ हा प्रकार घडला. मुलींचा रुद्रावतार पाहिल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकांनीही तरुणाला फटके (धुलाई)देत त्याला पोलिसांकडे सोपवलं.

Post a Comment

Previous Post Next Post