हनुमान मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी केली विटंबना


 शंकरपूर :- हनुमान किल्ला मंदिर येथील हनुमान मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली असून ही घटना सकाळी उघडकीस आली . आरोपीचा शोध घेऊन तत्काळ कारवाई करावी , अशी मागणी नागरिकांनी केली आहे . वृंदावन धाम हनुमान किल्ला मंदिर हे जागृत देवस्थान आहे . रविवारच्या मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी या विटंबना केल्याचे समजते . सोबतच मंदिरात असलेले फोटो व घड्याळ फोडले आहे . यासोबतच मूर्तीची बाजूलाच असलेल्या भिंती आणि शंकराची पिंड यांचेसुद्धा समाजकंटकांनी विटंबना केली आहे . तसेच दानपेटीसुध्दा फोडण्याचा प्रयत्न केला . सकाळी मंदिराचे स्वच्छता कामगार स्वच्छता करण्यासाठी गेले असता ही बाब उघडकीसआली . त्यांनी तत्काळ मंदिराचे ट्रस्टी सावरकर व शामराव शेंडे यांना माहिती दिली . त्यांनी तत्काळ पोलिस चौकीला या घटनेची माहिती दिली . पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ठाण्याचे भिसी पोलिस ठाणेदार राऊत , निरीक्षक सहायक पोलिस जांभुळे घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी घटनेचा तपास करून आरोपी शोधमोहीम सुरू केली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post