प्रियकर- प्रेयसीनी घेतला गळफास....गडचिरोली जिल्ह्यातील घटना

चामोर्शी : - सदर घटना चामोर्शी तालुक्यातील मुरखळा ( माल ) येथे घडली . अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकाशी प्रेम जुळले . पण वडीलांनी त्यावरून तिला रागावल्याचा तिच्यावर इतका परिणाम झाला की तिने थेट गळफास घेऊन जीवन संपविले . त्या युवतीचे ते कृत्य कळल्यानंतर संबंधित युवकानेही आपल्या घरी गळफास लावत आपल्या प्रेमाची परीक्षा दिली . पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , मुरखळा ( माल ) या लहानशा खेड्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे प्रेम गावातील गुराखी म्हणून काम करणाऱ्यांचा मुलगा वृषभ ( २१ वर्ष ) याच्याशी जुळले . वृषभ महाविद्यालयीन शिक्षण घेत होता . २२ मार्च रोजी मुलगी घरीच फोनवर त्या युवकाशी बोलत असताना वडिलांनी ऐकले . त्यावरून त्यांनी तिची खरडपट्टी काढली . ' असे सारखे फोनवर बोलत राहणे तुझे काम नाही , आधी व्यवस्थित शिक्षण घेणे , ' असा सबुरीचा सल्लाही तिला दिला . पण याचा तिच्या मनावर चांगलाच परिणाम झाला आणि तिने कोणताही विचार न करता आपल्या काकाच्या घरी जाऊन गळफास लावून घेतला .

मुलीने गळफास लावल्याचे लक्षात येताच आरडाओरड झाली . कुटुंबीयांनी तिला लगेच चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले , पण तिला मृत घोषित करण्यात आले . या घटनेचे वृत्त वृषभच्याही कानावर गेले . आपल्यासाठी तिने आत्महत्या केली , आता आपण जगून काय उपयोग , असा विचार करून त्यानेही आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली . दोन्ही घटनांची नोंद चामोर्शी पोलिसांनी घेतली असून तपास पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जोगेश्वर वाकुडकर व विरकान साखरे करीत आहे

Post a Comment

Previous Post Next Post