अडीच हेक्टरवर रानडुक्करांनी घातला धुमाकूळ

(वन विभागाने पंचनामा करुन नुक्सान भरपाई देण्याची मागणी)

कूरखेडा:-
तालूक्यातील गेवर्धा जगंल शिवारात असलेल्या कुरखेडा येथील माजी नगराध्यक्ष व प्रगतीशिल शेतकरी डॉ. महेन्द्रकुमार मोहबंसी यांचा अडीच हेक्टर क्षेत्रात लावण्यात आलेला मका पीक काल रात्री रानटी डूकरांचा कळपाने हल्ला करीत उध्वस्त केल्याने शेतकर्याचे अंदाजे दिड लाखाचे नूकसान झाले आहे.
गेवर्धा परीसरात रानटी डूकरानी मोठा हैदोस माजविलेला आहे. यापूर्वी सूद्धा अनेक शेतकर्यांचे शेतातील उभे पीक रानटी डूकरांचा कळपाने फस्त व उध्वस्त केले आहे. सातत्याने होणार्या डूकरांचा हल्ल्याने या परीसरातील शेतकरी हतबल झालेला आहे. वनविभागाने या रानटी डूकरांचा व अन्य रानटी प्राण्यापासून शेतकर्यांचा पीकांचे रक्षण होण्याकरीता आवश्यक उपाययोजणा करावी व नूकसान झालेल्या शेतकर्याचा पीकाचे पंचनामे करीत त्याना नूकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्याकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post