हातात हात घालून कुटुंबासमोर केली प्रेमयुगलांनी आत्महत्या

बेला:-.घरून निघून गेलेले प्रेमीयुगुल रस्त्याने जात असल्याचे कुटुंबियांना दिसून आले. यानंतर दोघांनीही हातात हात घेऊन शेतातील विहिरीकडे धावत जात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबीयांच्या नजरे समक्ष सोमवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे बेला व वडगाव परिसरातील समाजमन हळहळून गेले.

बेला येथील महेश शालीक ठाकरे (26) व वडगावची तन्वी विठ्ठल चुटे (16) यांची चांगली ओळख होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जीवनाचा संसार सुरू करण्यासाठी त्या दोघांनीही आपल्या आई-बाबांना न सांगता शुक्रवार 25 मार्चला घरून पलायन केले. त्यांचाशोधाशोध सुरू होता. तीन-चार दिवस घराबाहेर असताना ते दोघेही बेला कुर्लाचे रस्त्याने जात आहे. अशी माहिती ठाकरे कुटुंबीयांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता या प्रेमीयुगुलाने हातात हात धरून धावत जात अक्षय जनार्दन कांबळे रा. कुर्ला यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली व प्रेमाचा करुण अंत केला. ही वार्ता महेशच्या कुटुंबियांनी तन्वीच्या कुटुंबियांना व पोलिसांना सांगितली. घटनास्थळ समुद्रपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने तेथील पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.

Post a Comment

Previous Post Next Post