पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी मोबाईल रिपेरिंग करण्यार्‍यांकडून पराभूत



पंजाबच्या लोकांनी कमाल करुन दाखवली असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी हे विधान केलंय. यावेळी मनिष सिसोदियादेखील सोबत होते. पंजाबच्या निकालानं मोठमोठ्या खुर्च्या हादरल्या आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
पंजाबमध्ये आपच्या झाडूनं कमालच केला आहे. पंजाबमध्ये आपनं जोरदार मुसंडी मारली असून भाजपचा धुव्वा उडवला तर सत्ताधारी कांग्रेसला चारो खाने चित्त केलं. पंजाबात कांग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाले असून मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना दोन्ही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. एका सर्वसामान्य माणसानं चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. चरणजीत सिंह यांचा पराभव करणार्‍या आपच्या उमेदवाराचं नाव लाभ सिंह उगोके असं आहे. आपचा हा विजयी उमेदवार एका मोबाईल रिपोरींग करणार्‍या कंपनीत नोकरीला असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यांची आई एका सरकारी शाळेत सफाई कर्मचारी आहे, तर वडील शेतकरी आहेत, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
पंजाबच्या लोकांनी कमाल करुन दाखवली असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी हे विधान केलंय. यावेळी मनिष सिसोदियादेखील सोबत होते. पंजाबच्या निकालानं मोठमोठ्या खुर्च्या हादरल्या आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. सुखबिंदसिंह बादल, प्रकाशसिंह बादल, नवज्योत सिंह सिद्धू, विक्रम सिंह मजिठिया पराभूत झाले असल्याचं त्यांनी म्हटलंय. पंजाबमध्ये मोठा इन्कलाब झाला असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.
केजरीवाल यांनी म्हटलंय की, आपण असा भारत बनवुया की कुठल्याही मुलाला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जाण्याची गरज पडू नये, इतके मेडीकल कॉलेज आपण आपल्याच देशात बनवुया. तुम्हाला माहितीय, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांना हरवणारा कोण आहे? त्याचं नाव आहे लाभ सिंग उगोके, काय करतो लाभ सिंग उगोके? तो एका मोबाईल रिपेअर करणार्‍या कंपनीत नोकरी करतो, त्याची आई सरकारी शाळेत सफाई कामगार आहे, वडील शेतात रोजंदारीवर काम करतात, अशा व्यक्तीने चन्नीला हरवलं आहे.
लाभ सिंह उगोके यांनी भदौरमधून निवडणूक लढवली होती. आम आदमी पार्टीतर्फे निवडणूक लढवलेल्या आणि विजयी झालेल्या लाभ सिंह उगोके यांचं वय 35 वर्ष आहे. त्यांचं बारावीपर्यंत शिक्षण झालंय. 3 लाख 70 हजार रुपये इतकी संपत्ती असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post