टिकटाॅक, इन्टाग्रामच्या नादात बालीकेसह युवक शेततळ्यात बुडाले




कुष्ठा येथील घटना
गावात शोककळा
हल्लीच्या बालक, नवयुवक, युवती अर्थात आबालवृद्धासह सर्वानाच आभासी दुनियेचं वेड लागलेले दिसुन येते सोबतच सेल्फीचे फॅडही वाढले. नानातर्‍हेचे चित्रीकरण करुन फोटो घेणे नित्याचेच हेच प्रसंगी जिवावर बेतल्याची घटना पथ्रोट पोलीस स्टेशन हद्दीतील कुष्ठा शेतशिवारातील   घडली शेततळ्यात १३ वर्षीय बालीकेसह २५ वर्षीय युवकाचा बुडुन दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना काल रविवारीला संध्याकाळी ५.३० वाजता घडली. कुष्ठा परिसरात शोककळा पसरली
    मिळालेल्या माहीतीनुसार माजी सभापती स्व. हरीदासजी नाथे यांच्या कुष्ठा शेतात शेततळे असुन त्यांच्याच शेतातील रखवालदाराचा मुलगा बाजीलाल मुन्ना कास्देकर हा नेहमीच गावातील मुलीसह स्वताच्या भाचीस सोबत घेऊन शेतळ्याभोवती चित्रीकरण करुन इन्टाग्रामवर पोस्ट करायचा. रविवारी संध्याकाळी नित्याप्रमाणे गावातील हर्षाली विनोद वांगे हिचे चित्रीकरण करताना हर्षाली पाय घसरुन शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली तिला वाचवण्याच्या प्रयत्नात हा ही बुडाला. दोघेही पाण्यात बुडाल्याची माहीती ग्रामस्थाना  मिळताच पथ्रोट पोलीसाना कळविण्यात आले.  संध्याकाळी ७ वा. पोलीस बचावपथकासह घटनास्थळी दाखल झाले व तपास केला मात्र रात्री उशीर व अंधार झाल्याने तपास थांबवुन सोमवारी (आज) सकाळी शोध घेतला असता दोघांचे शव पाण्याबाहेर काढुन पंचनामा करुन उत्तरीय तपासणीकरीता अचलपुर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. घटनास्थळी ग्रामस्थानी गर्दी दिसुन आली व प्रत्येकजन दुर्देवी घटनेबाबत हळहळ व्यक्त करीत होते.
  मृत बालीकेस २ बहीणी तर मृत युवकास १ भाऊ असुन त्याचे वडील सदर शेततळ्याच्या शेतात रखवालदार म्हणुन कार्यरत आहे.
वास्तवात कहाणी घडली
सदर युवकाने आभासी माध्यमावर रविवारी चित्रफीत प्रकाशीत केली असता त्यात सबर कर मेरी जान किस्सा नही अपनी कहाणी होगी अश्या आशयाचा मजकुर त्यात आहे. वास्तवात हाच मजकुर प्रत्यक्षात तंतोतंत खरा ठरला म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पुढील तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनात हे.पो. काॅ. अशोक पळसपगार, हेमंत येरखडे, नरेश धाकडे, विजय गायकवाड करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post