रेगुंठाचे दबंग ऑफिसर विजय सानप जिल्ह्यात प्रथम स्थानावर


गडचिरोली:- पोलीस दलातर्फे पोलीस दादालोरा खिडकी हा उपक्रम मागील काही दिवसांपासून राबविण्यात येत आहे यामध्ये विविध कागदपत्रे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी जीवनावश्यक उपक्रम, युवकांना मार्गदर्शन असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यात रेगुंठा उप पोलीस  स्टेशननी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. याचाच एक भाग म्हणून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर ऑफ द मंथ माहे फरवरी च्या कामगिरी अहवालात रेगुंठा उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विजय सानप सर ,पोउपनि सागर पाटील सर व पोउपनि निजाम सय्यद सर  यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यासाठी त्यांना पोलीस अधिक्षक गडचिरोली अंकित गोयल यांच्याकडून पाच हजार रूपये व प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले. 

या कामगिरी अहवालामध्ये पोलीस उपनिरीक्षक नारायण राठोड व सजाण मेश्राम पोलीस मदत केंद्र मालेवाडा  यांनी दुसरा क्रमांक मिळाला असून  त्यांना रुपये 3000 व प्रशस्तीपत्र देण्यात आला तर तृतीय क्रमांकावर पोलीस मदत केंद्र कोटमीचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम व शिपाई शकुंतला दुग्गा यांना प्रशस्तीपत्र व रुपये 2000 बक्षीस  स्वरूपात मिळाले आहे. या सर्वांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.  संपूर्ण जिल्ह्यात रेगुंठा उप पोलीस स्टेशनला प्रथम क्रमांक  मिळणे ही बाब रेगुंठा व परिसरातील जनतेसाठी अभिमानास्पद आहे. याचे संपूर्ण श्रेय उपनिरीक्षक विजय सानप व त्यांच्या संपूर्ण टीमला जाते.

Post a Comment

Previous Post Next Post