दुःखद घटना गॅस सिलिंडर च्या स्फोटात माय लेकीचा मृत्यू...


यवतमाळ:- ९ मार्च चा सूर्य आयता येथील जैस्वाल कुटुंबीयांसाठी काळ रात्र घेऊनच उगवला. कोणालाही कल्पना नव्हती की, या दिवशी आपल्या गावात काही आक्रित घडेल, तद्वतच आपल्या कुटुंबाच्या सुख, समाधान व शांती साठी पुण्यार्जना करीता निघालेल्या पतीची भावनासुद्धा परमेश्वराच्या लक्षात आली नाही. कदाचित त्यामुळेच ते सुद्धा दुःखद प्रसंगी धावून आले नाही.
मात्र पारव्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी उध्वस्त झालेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी कंबर कसली व माणुसकीची हाक म्हणून कोरोना काळात उद्योगधंदे बुडाले, रोजगाराच्या वाटा धुसर झाल्या अशा संकट काळात आपल्या जिवाभावाची माणसे गर्भवती पत्नी काजल व अंगा खंद्यावर खेळणारी ५ वर्षाची चिमुकली वैभवलक्ष्मी कायम स्वरुपी नजरेआड होणे यापेक्षा मोठे दुःख कोणाच्या वाटेला येवू नये. अशी हृदयदावक घटना घडली. ९ मार्च ला सकाळी ८ वाजताचे सूमारास गॅस सिलिंडर चा स्फोट झाल्याने संपूर्ण घरासह आगीमध्ये गरोदर माता सौ काजल विनोद जयस्वाल (३०)व त्यांची ५ वर्षाची मुलगी वैभवलक्ष्मी या दोघींचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे सदर कुटुंबियांस मदत करण्याचे आवाहन पारवा येथिल ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घाटंजी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयता येथे जाऊन विनोद जयस्वाल यांची भेट घेतली व त्यांना मदत निधी म्हणून भेट दिले. त्यावेळी त्यांचे उर भरून आले. साहेब, खरंच माझी मुलगी खूप चांगली होती हो. असा हंबरडा त्यांनी फोडल्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांचे डोळे पाणावले. त्यातच त्यांनी रेकॉर्डिंग केलेला मुलीचा व्हिडिओ दाखविला. ते पाहून वातावरणात नीरव शांतता पसरली, सर्व सुन्न झाले.

सुरुवातीला पोहोचल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या उध्वस्त झालेल्या घरात प्रवेश केला.
प्रवेश करताच आमचे स्वागत करपट वासानेच केले. अगोदरच्या दिवशी हसी खुशीने संपन्न असलेले घर आज निर्जीव वाटत होते. त्या घरातल्या प्रत्येक वस्तू जणू प्रत्येक क्षणाची आठवण करून देत होते. विशेष म्हणजे वैभवलक्ष्मीचे जीवापाड जपून ठेवलेले खेळणे अस्ताव्यस्त पडलेली दिसून येत होते. ज्या खेळण्यामुळे तिचा घात झाला. ते जणू आम्हाला वेळोवेळी त्या क्षणाची आठवण करून देत होते. तिचे कपडे व संसारोपयोगी लागणारे सर्व साहित्य झालेल्या प्रसंगाची साक्ष देत होते. एवढेच काय तर त्यादिवशी त्यांनी बनवलेले जे पदार्थ आहे ते त्याच जागेवरच होते. ते पदार्थ सुद्धा घरच्या सदस्यांची वाट पाहत होते. कदाचित त्यांनाही वाटत असावे की, त्यांच्या पोटाची भूक शमविण्यासाठी आम्ही सज्ज आहो, मात्र ते अद्याप का आले नाही, याचे ही दुःख कदाचित त्यांना होत असावे. निर्मनुष्य असलेल्या या घरात आता केवळ त्यांच्या आठवणी चा इतिहास जमा झालेला होता.सदर सर्व घटनाक्रम पत्रकारांच्या डोळ्यासमोर आला असता त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी विनोद जैस्वाल यांचा निरोप घेतला. मात्र या बिकट परिस्थितीमध्ये सावरण्याकरिता आर्थिक थैर्य देणारे पारव्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानायला ते विसरले नाही. सोबतच पत्रकारांनी सुद्धा ठाणेदाराचे आभार मानले.प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देवतळे, सचिव राजू चव्हाण कोषाध्यक्ष सागर सन्मनवार, पांडुरंग निवल, संतोष पोटपिल्लेवार, प्रदीप वाकपैजन, अरुण कांबळे, योगेश ढवळे, प्रेमदास चव्हाण, अस्लम कुरेशी, रमेश माद्स्तवार, मलैया खंडारे, पारिवारिक सदस्य उकले उकले आदी उपस्थित होते. सोबतच जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव कांबळे, चंद्रकांत ढवळे, अयनुद्दीन सोळंकी, सुधाकर अक्कलवार, आकाश बुर्रेवार, कुणाल तांगडे यांचे आर्थिक सहकार्य लाभले.



Post a Comment

Previous Post Next Post