पतीने केला पत्नीवर बलात्कार

कर्नाटक- बलात्कारचा अर्थ बलात्कारच असतो . जरी तो बलात्कार पतीने केला का असेना . महिलेच्या सहमतीशिवाय शारिरीक संबंध ठेवणे बलात्काराच्या श्रेणीतच ठेवले जाणार आहे . एका प्रकरणात पत्नीवर तिच्याच पतीने बलात्कार केल्याचा आरोप आहे . या प्रकरणाची सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे . आरोपी पतीवर कलम ३७६ अंतर्गत सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले .या खटल्यात पतीच्या वकिलांनी युक्तिवाद केला , की त्यांच्या अशिलाने महिलेशी विवाह केला आहे . ते महिलेशी शारीरिक संबंध ठेवू शकतात . असे संबंध बलात्काराच्या श्रेणीत ठेवले जाऊ शकत नाही . परंचु त्यांचा युक्तिवाद फेटाळत न्यायालयाने माणूस हा माणूस आहे आणि बलात्काराचा अर्थ बलात्कार आहे . अशा संबंधाला बलात्काराच्या श्रेणीतच ठेवले जाईल .न्यायालय म्हणाले , की प्रत्येक महिलेला आपले आयुष्य असते . लग्नानंतर पतीचा तिच्यावर हक्क असतो यात काहीच शंका नाही . परंतु तिची स्वतःची इच्छाही असते . पती हवे तेव्हा तिला वापरू शकतो असे नाही . या प्रकरणात पतीला तिच्या इच्छेचा सन्मान करायला हवा . पतीच्या अशा वागण्यामुळे महिलेच्या मनावर विपरित परिणाम होतात .न्यायालय म्हणाले , बलात्काराच्या आरोपात कलम ३७६ अंतर्गत कारवाई केली जाते . पतीने पत्नीशी जबरदस्तीने संबंध ठेवल्यामुळे पतीला सोडले जाऊ शकत नाही . विशेष म्हणजे कलम ३७६ अंतर्गत पतीला दोषी मानले जात नाही . वैवाहिक बलात्काराला भारतीय कायद्यात मान्यता नाही आहे . हा गुन्हा मानला जात नाही .

Post a Comment

Previous Post Next Post