नक्षलवाद्यांनी भर दिवसा हायवा ट्रक पेटविला


बस्तर : नक्षल सप्ताह दरम्यान भरदिवसा हायवा टकची जाळपोळ केल्याची घटना आज गुरुवारी बासागुडा -अवापल्ली मार्गावर नक्षल्यांनी घडवून आणली . नक्षल्यांच्या वतीने काल 23 मार्च पासून छत्तीसगड मध्ये नक्षल सप्ताह राबविण्यात येत आहे . दरम्यान आज सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी नक्षल्यांनी भरदिवसा बासागुडा -अवापल्ली मार्गावर हायवा ट्रकची जाळपोळ केली . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे . तारेम परिसरात हायवा वाहनाद्वारे गिट्टीची वाहतूक करण्याचे काम सुरु होते . दरम्यान नक्षल्यांनी वाहनाला थांबवून चालकाला उतरवून डिझेल टाकी फोडून पेटवून दिले व जंगलात पसार झाले . 7 ते 8 ग्रामीण वेशभूषेतील नक्षली असल्याचे सांगण्यात येत आहे .

सदर घटनेची महितो मिळताच आवपल्ली पोलीस ठाण्याचे जवान घटनास्थळी दाखल झाले व परीसरात शोधमोहीम राबविली . नक्षल सप्ताह हा 23 मार्चपासून सुरू असून 29 मार्चपर्यंत चालणार असल्याचे कळते . काल 23 मार्च रोजी नक्षल्यांनी ओरछा ब्लॉकला नारायणपूर जिल्हा मुख्यालयाला जोडनारा रस्ता खोदून ठेवला व रस्त्याच्या मधोमध बॅनरही बांधले होते .

Post a Comment

Previous Post Next Post