ग्रामसेवक साहेब पिऊन तर्र ; मासिक सभा रद्द


साकोली : आज दि.२८ मार्चला ग्रामपंचायत विर्सी येथे मासिक सभा सकाळी ११ ला असल्याने सर्व ग्रामपंचायत कमेटी कार्यालयात हजर झाली पण दृष्यम काही वेगळेच पाहुन सारे थक्क झाले की ग्रामसेवक साहेबच महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था सांभाळणारे पेय पिऊन तर्रपणे आपल्या सिंहासनावर आडव्या अवस्थेत होते. सा-यांनी त्यांना पाणी मारून उठविण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि ग्रामपंचायत विर्सी येथील मासिक सभा महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था सांभाळणारे पेय प्राशनाने नाईलाजास्तव रद्द करण्यात आली.
      आज २८ मार्चला विर्शी येथे सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्यगण सभेसाठी येताच सचिव ग्रामसेवक पब्बेवार हे आपल्या दालनातील आसनावर अतिमद्यप्राशन करून बेहोशपणे झोपून नशेत अगदी तर्र झाले होते. सर्वांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला पण काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर होणारी मासिक सभा रद्द करावी लागली. सर्व ग्रामपंचायतचे सदस्यांनी व सरपंच उपसरपंच यांनी पंचायत समिति साकोलीत जात खंड विकास अधिकारी यांकडे तक्रार केली पण काहीच प्रतिसाद मिळत नाही हे बघून सर्व साकोली पोलीस ठाणे येथे जात या मद्यप्राशन करून शासकीय सेवेत येणे प्रकरणाची माहिती देण्यात आली. आता यावर साकोली पंचायत समिति प्रशासनाकडून ग्रामसेवक श्री पब्बेवार यांवर महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था सांभाळणारे पेय पिऊन शासकीय मासिक सभा रद्द प्रकरणी काय एक्शन कारवाई होते याकडे विर्शी ग्रामवासीयांचे लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post