अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अकोला:- शिरपूरजैन, (वा.) शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत मसलापेन येथे 27 मार्च रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीला एका अल्पवयीन मुलाने फूस लावून पळवून नेले. 17 वर्षीय अल्पवयीन मुले-मुली, दोघेही रा. मसलापेन हे केशवनगर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत सोबतच शिक्षण घेत आहेत. या दोघांचे एकमेकांवर प्रेम असून या प्रेमप्रकरणाची कुटुंबीयांना कल्पना आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी 27 मार्च रोजी शिरपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि महादेव भारसाकळे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post