देवेंद्र फडणविस यांना नोटीस बजावल्या प्रकरणी राज्य शासनाचा जाहिर निषेध देसाईगंज तालुका भाजपाच्या वतिने बेकायदेशीर नोटिशाची होळी




देसाईगंज:
फोन टॅपिंग आणि पोलिस बदली घोटाळा प्रकरणातील गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना बजावण्यात आलेल्या नोटीशीचा जाहिर निषेध करत देसाईगंज तालुका भाजपाच्या वतिने बेकायदेशीर नोटिसची येथील फव्वारा चौकात होळी करण्यात आली.
 विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना सायबर पोलिस ठाणे,मुंबई येथे दाखल वि.स्था.गु.क्र.०२२०२१ कलम ३० भारतीय टेलिग्राफ ॲक्ट सह कलम ४३ ब,६६ माहिती तंञज्ञान अधिनियम २००८ सुधारीत सह कलम ०५ ऑफिसीयल सिक्रेट ॲक्ट १९२३ दाखल गुन्ह्याचा तपास कामी नोटीस बजावण्यात आली आहे.ही नोटीस राज्य शासन व मुंबई पोलिस      यांनी सुड भावनेतून बजावली असल्याने त्याचा निषेध म्हणून देसाईगंज भाजपाच्या वतिने येथील फव्वारा चौकात बजावण्यात आलेल्या नोटीशीची होळी करत जाहिर निषेध करण्यात आला. 
 
  
यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, तालुका अध्यक्ष राजु जेठाणी, सभापती रेवता अणोले, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनील पारधी, केवळराम झोडे,दिपक झरकर,सचिन खरकाटे, आबिदअली सैय्यद,विलास साळवे,श्याम उईके,श्यामराव अणोले, मेघश्याम डांगे यासह भाजपाचे पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post