'पोलीस पाटी' लावलेल्या वाहनाचा झाला अपघात पोलीस पाटी संशयास्पद


ब्रह्मपुरी :- रस्त्याच्या कडेला उभ्या चारचाकी चालकाने अचानक उघडल्याने मागून येणारी दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुर्गा मंगल कार्यालयाजवळ घडली . देवीदास लिंगायत , रा मांगली असे जखमीचे नाव आहे . सदर चारचाकी वाहनात ' पोलीस ' लिहिलेली पाटी असल्याने घटनास्थळी चर्चेला उधाण आले होते . पोलिसांनी उशिरा घटनेची दखल घेत एफ.आय.आर. दाखल केला . तालुक्यातील दूधवाही येथे साळ्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून ब्रह्मपुरी येथे येत असताना तक्रारकर्ता प्रकाश लोखंडे ब्रह्मपुरी हे परिवारासह परत येत होते . परत येताना समोर सासरे ( क्र . एम . एच ३४ पी २६३८ ) दुचाकीने येत होते . तर जावई प्रकाश मागे होते दुर्गा मंगल कार्यालयाजवळ येताच उभ्या चारचाकी हुंडाई ( क्र.एम. एच . १२ पी . टी . ७४०६ ) च्या चालकाने अचानक दार उघडल्याने दुचाकी दाराला धडकली . यात देवीदास लिंगायत रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.

पोलीस ' नावाची पाटी संशयास्पद बाहेर गावाहून ब्रह्मपुरी येथे आलेल्या चारचाकी वाहनात पोलीस असे इंग्रजीत लिहिलेली पाटी समोरील काचाच्या आत ठेवण्यात आली होती . त्यामुळे हे वाहन पोलीस विभागाचे असेल असे नागरिकांना वाटले . मात्र , एम एच . १२ सिरीज असलेल्या वाहनाची पासिंग पुणे येथील आहे अपघात होताच चालकाने उपस्थितांशी अरेरावीची भाषा वापरून माझे वडील पी एस . आय असल्याचे सांगितले . सदर वाहनावरील पोलीस नावाची पाटी संशयास्पद असल्याचे दिसून आले .

Post a Comment

Previous Post Next Post