पी. डी. एज्युकेशन आयोजित *यशोत्सव सोहळा - 2022* मोठ्या उत्साहात साजरा

भवन रामटेके आरमोरी (ता.प्रतिनिधी) : शहरातील पी. डी. एज्युकेशन & फिजिकल अकॅडेमीच्या वतीने आयोजित *यशोत्सव - 2022* सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

कार्यक्रमामध्ये नुकत्याच लागलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या निकालामध्ये उत्तीर्ण यशवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रातून 46 वे व विदर्भातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण सचिन वासेकर (PSI - 2019), सोनापूर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) उपस्थित होते.

       कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मनोज काळबांडे (ठाणेदार, पो. स्टे. आरमोरी), विशेष अतिथी  कांचन उईके (PSI - पो. स्टे. आरमोरी), प्रमुख पाहूणे म्हणून सतीश पावसे (अधीक्षक, शा. आ. मु. व.) व प्रभाकर गडपायले ( जि. प. शिक्षक) उपस्थित होते.

 याप्रसंगी बोलतांना सचिन वासेकर यांनी स्पर्धा परीक्षांविषयी सखोल मार्गदर्शन करतांना, एम. पी. एस. सी. परीक्षांचा अभ्यास करतांना सातत्यपूर्ण अभ्यासाची व संयमाची अत्यंत आवश्यकता आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, जुन्या प्रश्नपत्रिका व एक मार्गदर्शक असला की स्पर्धा परीक्षांचा मार्ग सुकर होतो. सर्वांनी कठोर मेहनतीने आपले ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण पी. डी. एज्युकेशनचे संचालक दिनेश देशमुख यांनी केले. तर संचालन योगाजी वाकडे या विद्यार्थ्यांने केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन अमन वेलादी या पी. डी. एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांने केले.

Post a Comment

Previous Post Next Post