जावयाने केली सासऱ्याची हत्या... जावयाला अटक

यवतमाळ:- मुलीला सासरी पाठविण्यास नकार देण्याऱ्या सासऱ्याची जावयाने संगनमत करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

विश्राम बिसनजी वयले (55) रा. टिटवा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती असे मृत सासऱ्याचे नाव आहे. जावई राजेश मधुकर शिवणकर ( 32 ), रा. घुईखेड, देवराव तुकाराम मारबदे (48) रा. टिटवा असे शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमरावती जिल्ह्यातील टिटवा येथील विश्राम वयले यांच्या मुलीचा विवाह राजेश शिवणकर यांच्याशी झाला आहे. परंतु काही दिवसांपासूनत्याचे पत्नीसोबत जमत नसल्याने ती माहेरी टिटवा येथे गेली होती. तिला आणण्यासाठी राजेश सासरी गेला होता. मात्र विश्राम वयले यांनी मुलीला पाठविण्यास नकार दिला. दरम्यान विश्राम वयले हे बाभुळगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतात कामाला निघून गेले. गुरुवार, 31 मार्चला रात्रीपर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा मुलगा व इतर नातेवाइकांनी शोध घेतला. मात्र रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह पिंपळखुटा येथील शेतात आढळून आला. घटनेची माहिती बाभुळगाव पोलिसांना देण्यात आली. त्यावरूनपोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी शंकर विश्राम वयले रा. टिटवा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेश शिवणकर व देवराव मारबदे या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने लाकडी दांड्याच्या साहाय्याने मृतकाच्या डोक्यावर वार करून खून केल्याचे कबूल केले. आरोपींना शुक्रवार, 1 एप्रिलला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेंद्र जेधे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, जमादार अशोक गायकी, गणेश शिंदे, आशीष अवजाडे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post