जुगार खेळणाऱ्या पतीने पैशाच्या लालसेपोटी पत्नीच्या शरीराचा चक्क सौदा केला

उत्तर प्रदेश:- पैशाच्या लोभापायी जुगारी काय करतील, याचा काहीच नेम नाही. एका जुगाऱ्याने पैशासाठी मित्रांसोबत नको त्या गोष्टी करायला लावल्या. तिचे दागिने विकले. तिला वेश्या व्यवसायात ढकलले आणि आता तर तिचा थेट लिलावच केला आहे. या प्रकरणी पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. जुगार खेळणाऱ्या पतीने पैशाच्या लालसेपोटी पत्नीच्या शरीराचा सौदा केला. पतीने वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप पत्नीने केला आहे. बदाऊनमध्येमहिलेला ओलीस ठेवण्यात आले होते. जिथे महिला पोलिस हेल्पलाइनच्या माध्यमातून
तिची सुटका करण्यात आली.या प्रकरणी सुभाषनगर कॉलनीत राहणाऱ्या महिलेने सांगितले की, सुमारे १९ वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. लग्नानंतर नवऱ्याने तिचे दागिने, पैसे जुगारात खर्च केले. महिलेचे मंगळसूत्र विकले. यानंतर पैसे घेऊन तो मित्रांसोबत शय्यासोबत करायला लावायचा. त्यानंतर तिला वेश्या व्यवसायात ढकलले. जानेवारीत त्याने बदायूंतील कुंवर गाव परिसरात तिचा सौदा केला.

दरम्यान, तिला कुंवर गावात ओलीस ठेवण्यात आले होते. काही ग्रामस्थांनी पोलिस हेल्पलाइन आणि जिल्हा परिविक्षा अधिकारी यांना माहितीकेली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या
दिली. त्यावर पोलिसांच्या पथकाने तिची सुटका आदेशानुसार, सुभाषनगर पोलिस ठाण्यात
पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post