बकरा चोरणाऱ्या चोरट्याला अवघ्या सहा तासात केली अटक

पुलगाव (वा.) घराच्या मागील बाजूस बांधून असलेला बकरा चोरणाऱ्या चोरट्याला अवघ्या सहा तासात अटक केले आहे. ही कारवाई पुलगाव पोलिसांच्या वतीने करण्यात आली.

फिर्यादी पुनमकौर खुनसिंग बावरी (वय 44 ) रा. सरदार मोहल्ला वार्ड क्र.09 जुना पुलगाव ता. देवळी यांनी 8 एप्रिल रोजी घराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत बांधून असलेला एकबकरा (किंमत 12 हजार) कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून रात्र दरम्यान, चोरुन नेल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. तोंडी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. पोलिस तपास करीत असताना सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन विचारपूस मुखबीरमार्फत माहितीवरून आरोपी अजय अरुण मारगाये (24) रा. पुलगाव याला ताब्यात घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post