कीर्तनकार बाबाची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर पोलिस स्टेशनमध्ये गून्हा दाखल

महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबत कीर्तनकार बाबाची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या त्या व्हिडिओमधील महाराजासह महिलेवर देखील धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मोगल (वय ४८, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

साधारण पाच दिवसांपूर्वी बाळकृष्ण माेगल याच्यासोबत समव्यावसायिक ४० वर्षीय महिलेची अश्लील चित्रफीत गंगापूर, वैजापूर तालुक्यात व्हायरल झाली होती. संबंधित चित्रफीत काही क्षणातच संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. संबंधित चित्रफितीत कीर्तनकार बाळकृष्ण मोगल आणि समव्यावसायिक महिला नको त्या अवस्थेत दिसून येत होती.

किर्तनकार महाराजांचे कीर्तन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते त्यावेळी सदर महाराजांचे किर्तन ठरविण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि यापूर्वीच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा आणि आम्हाला ते व्हिडीओ ग्रामस्थांना दाखवता येतील असे ते म्हणाले त्यावर महाराजाकडून किर्तनाच्या व्हिडिओसोबत तो भलत्याच कार्यक्रमाचा व्हिडिओदेखील चुकून पाठवला गेला आणि तो व्हायरल झाला.

व्हिडिओमध्ये महाराजांसोबत ‘शरीरसंबंध’ ठेवताना दिसणारी महिला सुद्धा त्यांच्याच क्षेत्रात काम करणारी औरंगाबाद जिल्ह्यातील त्यांची सहकारी असून महिलेने नशा केला असावा असे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओतील महिलेला स्पष्टपणे बोलता येत नव्हते आणि सतत डोक्याला हात मारुन डोकं दुखत असल्याचं व्हिडिओतील संभाषणत दिसत आहे. व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे पण स्पष्ट होऊ शकलेलं नाही मात्र कीर्तनकार महाराजांच्या अब्रूची लक्तरे यामुळे सोशल मीडियावर लटकली.

एका हॉटेलमध्ये विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे क्लिपमध्ये दिसून येत होते. कीर्तनकार बाबा आणि या महिलेमुळे धार्मिक भावना दुखावल्या असून ज्ञानेश्वर माणिकराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून बाळकृष्ण मोगल याच्यासह त्या समव्यावसायिक महिलेवर शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post