*अबब... तलाठी म्हणे सरपंच-सचिवाला तुम्ही "चावडीवर" या* *मानकीच्या तलाठ्याचा मनमानी कारभार* *तलाठ्याच्या बदलीबाबत ग्रामसभेत ठराव मंजूर*


वणी : परशुराम पोटे

तालुक्यातील मौजे माणकी येथिल तलाठी अशोक मडपाचे यांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज चक्क सरपंच- सचिवाला "तुम्हाला काम असेल तर चावडीवर या" असे म्हणुन मनमानी पणाचा कळसच गाठला आहे. इतकेच नाही तर तलाठी मडपाचे विरोधात अनेक तक्रारी येत असल्याने त्यांची बदली करण्याची मागणी होत आहे. याबाबत आज दि.१३ एप्रिल ला  ग्राम पंचायत कार्यालयात बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत तलाठी अशोक मडपाचे यांची बदली करण्याबाबत ठराव स्विकृत करण्यात आला असून ठरावाची प्रत उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना देण्यात आली असून बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज दि. १३ एप्रिल ला सकाळी १० वाजता ग्राम पंचायतीच्या वतीने विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सरपंच कैलास पिपराडे, उपसरंप शंकर माहुरे, सदस्य नानाजी पारखी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे,गावकरी व सचीव सौ.वाढई उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यानंतर तलाठी अंतर्गत येणारे विषय तलाठी उपस्थित नसल्याने मांडण्यात आले नाही. यावेळी सरपंच, सचिवांनी तलाठी अशोक मडपाचे यांना ग्रामसभेत येण्यासाठी फोन केला असता तलाठी मडपाचे हे सरपंच कैलास पिपराडे व सचिव वाढई यांना म्हणे तुम्हाला काम असेल तर चावडीत या, असे उत्तर मिळाले. तलाठी अशोक मडपाचे यांच्याबाबत अनेक तक्रार येत असल्याने अखेर ग्रामसभेत तलाठी बदलविण्याकरीता चक्क ठरावच घेण्यात आला असून या ठरावाची प्रत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आली असून बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता उपविभागीय अधिकारी काय कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post