पुष्कर यात्रेच्या नावाखाली निधीत होतआहे भ्रष्टाचार- नागरिकांचा आरोप


सिरोंचा :- तालुक्यात बहूचर्चित असे पुष्कर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ते 24 एप्रिल या कालावधीत सिरोंचा येथील प्राणहिता नदी घाटावर सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्य शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने सिरोंचा शहरातील नगर घाट आणि येथील प्राणहिता नदी घाटावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने विकास कामे सुरू करण्यात आली आहेत.

पुष्कर यात्रा तोंडावर आली असल्यानेविकास कामांना वेग आला आहे. मात्र सदर विकासकामे करताना कामे दर्जेदार करण्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

सिरोंचा शहरातील प्राणहिता नदी घाटावर आयोजित पुष्कर यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांची निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र रस्ता निर्मितीच्या नावाखाली निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे. भाविकांना सोयी उपलब्ध होण्याची उद्देशाने सिरोंचा तालुक्यातील नगर घाट आणी सिरोंचा येथील प्राणहिता नादी घाटावर विकास कामे जोमात सुरू आहेत. मात्र कामांच्या उत्कृष्टतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post