लग्नाचा तगादा लावणाऱ्या ४५ वर्षीय प्रेयसीचा प्रियकराने जमिनीवर डोके आपटून केला खून

पुणे:- . लग्नाचा तगादा लावणाऱ्या ४५ वर्षीय प्रेयसीचा प्रियकराने जमिनीवर डोके आपटून खून केला. त्यानंतर तिच्या अंगावर असणारे दागिने, मोबाईल आणि एटीएमकार्डन घेऊन, प्रियकर पसार झाला. हडपसरमधील वैदुवाडीत ही घटना घडली आहे. सुनिता बाळू कदम (वय ४४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी किसन सिताराम जगताप (वय ४६, रा. बेलसर, पुरंदर) याला अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात सुनिता यांच्या २४ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, सुनिता या गेल्या काही वर्षापासून पतीपासून विभक्त राहत होत्या. त्यांचे व किसन यांचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. किसन याचाही विवाह झालेला असून, तो कारचालक म्हणून काम करत होता. यादरम्यान सुनिता या किसन याच्याकडे लग्न करण्याबाबत बोलत असत. त्यांनी गेल्या काही दिवसांत त्याच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. शुक्रवारी रात्री देखील त्यांच्यात यावरूनच वाद झाले. यावेळी रागाच्या भरात त्यांने सुनीता यांचा खून केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post