विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी धुलाई केलेला शिक्षक दवाखाना मधून झाला फरार

महाराष्ट्र:- शिक्षकाकडून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीला आली असून चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीची छेड करणाऱ्या शिक्षकाला संतप्त पालकांनी जबरदस्त चोप देत दिला आहे. नऊ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडलेली असून या शिक्षकावर विनयभंग आणि मानसिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहेद खान कासम पठाण ( वय ३३ राहणार नायगाव तालुका पाटोदा ) असे शिक्षकाचे नाव असून पीडित दहा वर्षीय मुलगी ही इयत्ता चौथीत शिकत असताना 8 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता मधल्या सुट्टीनंतर शाहिद खान पठाण हा शिकवण्यासाठी वर्गात आलेला होता त्यावेळी त्याने बाकड्यावर बसलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आणि वर्ग संपल्यानंतर बाहेर येताना त्याने पीडित मुलीला याबद्दल कोणाला काही सांगू नको असे सांगितले.

पीडित मुलीने नऊ एप्रिल ही घटना घरी सांगितली आणि नऊ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पीडित मुलीच्या संतप्त नातेवाईकांनी शाळेत धाव घेत व्यवस्थापनाला जाब विचारला त्यानंतर शिक्षक शाहेद खान याला बाहेर नेले लाथाबुक्क्यांनी चौक दिला त्यामुळे परिसरात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत नातेवाईकांना शांत करत पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन शाहेद खान पठाण याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे तर पिंक पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक मीना तुपे या अधिक तपास करत आहे नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात शाहिद खान हा जखमी होता मात्र तो १० तारखेला सकाळी हॉस्पिटलमधून फरार झाला असून तो सध्या नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे .


Post a Comment

Previous Post Next Post