अन् बापलेकाने पिटाळून लावले वाघाला!



सिंदेवाही: लोनवाही परिसरात प्रभाग व २ येथील पेट्रोल पंपाजवळील बोडीच्या मागील बाजूस असलेल्या देवीदास ठाकरे यांच्या घराच्या अंगणात वाघाने प्रवेश करून बघारीवर हल्ला चढविला, जनावरांचा आवाज होताच देवीदास ठाकरे व त्यांचा मुलगा अमर तिथे आले. त्यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. ही घटना रविवारी १२ वाजताच्या 
सुमारास घडली. 

शहरातील वर्दळीच्या परिसरातील लोनवाही रोडच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिक दहशतीत आहेत. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपाकडे वाघ गेल्याचे नागरिकांनी बघितले होते. लोनवाहीतील देवीदास ठाकरे यांच्या मालकीची म्हैस व वधार अंगणात बांधून ठेवली होती. रविवारी अमरने बघितले असता अंगणात वघारीच्या अंगावर वाघ बसून असल्याचे दिसले.

Post a Comment

Previous Post Next Post