गुंजेच्या "नाल्याची" ले आउट धारकांनी केली "नाली" *गुंजेचा नाला बंद करणाऱ्यावर त्वरीत कार्यवाही करा - रज्जाक पठाण यांची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*


वणी : परशुराम पोटे

 शहरालगत असलेल्या नांदेपेरा मार्गावर नुकतेच नविन ले आउट पाडण्यात आले असून या ले आउट धारकांनी गुंजेचा नालाच बंद केला असून नाला बंद करणाऱ्या ले आउट धारकांवर त्वरित कारवाई करुन नाला पर्ववत करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे कोषाध्यक्ष अ.रज्जाक पठाण यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वणी-नांदेपेरा रस्त्यालगत गुंजेचा नाल्याजवळ असलेले मौजा चिखलगांव शेत सर्व्हे क्र. २९/३.२८/४, २९/३अ नगरवाला जिनींग स्पिनींग मिल्स प्रा. लिमीटेड या नावाने आहेत व सर्व्हे क्र.२८/४ खुशी तुषार नगरवाला या नावाने शेत असून वरील ४ ही शेताचे जगन्नाथ नगर सोबत शेती विकण्याचा सौदा झाला असून शेताचे इसारपत्र करण्यात आले आहेत. असे निवेदनात म्हटले आहे. तसेच
वरील शेतातून गुंजेचा जिवंत नाला आहेत. हा नाला कळमना रस्त्याजवळून वरील शेतातून नांदेपेरा रस्त्यावर मोठा नाला वाहतो. नांदेपेरा रस्त्यावर पुल सुध्दा बांधून आहेत. असे असतांना जगन्नाथ नगर यांनी वरील ४ शेतात लेआऊट टाकण्याकरीता संपूर्ण ४ हि शेत लेव्हल केले असून शेतातून वाहणारा नाला ले आउट धारकांनी बंद केला व शेताच्या बाजुने पाणी वाहण्याकरीता एक छोटी नाली बनविली आहे. परंतू दरवर्षी पावसाळ्या मध्ये या नाल्याला मोठा पूर येतो, अनेक वेळा नांदेपेरा रस्ता बंद सुध्दा राहतो असे असतांना जगन्नाथ नगर यांनी स्वतःच्या फायदया करीता नाला बंद करणे कितपत योग्य आहे. जगन्नाथ नगर किंवा नगरवाला यांना नाला बंद करण्याचे कोणी परवानगी दिली किंवा स्वतःच्या मर्जीतुन नाला बंद करता येते काय ? असा प्रश्न तेथील दुकानदार, शेतकरी करीत आहे. तसेच या शेतात दरवर्षी तुर व कापसाचे उत्पन्न घेण्यात येते असे असतांना कोणत्या नियमा अंतर्गत या शेताला लेआऊटची परवानगी देता येते ? असा प्रश्न निवेदनातून उपस्थित केला आहे.
तसेच वरील शेतातून वाहनारा नाला बंद केल्यामुळे इतर शेतकऱ्याच्या शेतात व आजूबाजूच्या प्लॉटमध्ये व दुकानामध्ये पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण केला असून
 वरील शेतातून वाहणारा नाला पुर्ववत सुरु करण्यात यावा व ज्यांनी नाला बंद केला आहे त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अ.रज्जाक पठाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post