किरीट सोमैय्याला अटक करा,शिवसेनेची आक्रमक मागणी...

सत्यवान रामटेके(उपसंपादक)
"सुपरफास्ट न्यूज"
विक्रांत युद्धनौकेसाठी जमा केलेला पैसा राजभवनात न पोहचता तो किरीट सोमैय्या व त्याचा मुलगा निल सोमैय्या यांनी परस्पर स्वतःच्या निवडणुकीसाठी व बांधकाम व्यवसायात वापरला
याबाबत मुंबई येथे किरीट सोमैय्या व त्याच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.अशांना ताबडतोब अटक करण्यात यावी मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचे नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी आरमोरी येथे रस्त्यावर उतरून तीव्र निषेध केला व किरीट सोमैय्याला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
किरीट सोमैय्या याला अटक करा,भाजपा सरकार 'हाय हाय' असे नारे देऊन आरमोरी येथील परिसर गुंजत होता.आरमोरी येथील साई मंदीर ते बस्थानकापासून शेकडो शिवसैनिक,युवासैनिक यांनी निषेध रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचेसह उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,युवासेनेचे जिल्हाप्रमुख चंदू बेहरे,युवतीसेना जिल्हाप्रमुख उमा चंदेल,बांधकाम सभापती सागर मने,राहत सय्यद,पायल तिरंगम,शहर प्रमुख भूषण सातव, लहानुजी पिलारे,विकास प्रधान,नंदू चावला,शैलेश चिटमलवार,फालु इन्कने,अक्षय धकाते,राजू ढोरे,पुरुषोत्तम कामतकर,ईश्वर कराणकर, मोतीलाल लिंगायत,शैलेश ढोरे,व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post