सिरोंचा पुष्कर नदीत स्वच्छतेसाठी उतरले अधिकारी वर्ग*

गडचिरोली:-  जिल्ह्यातील सिरोंचा प्राण्याचा नदी घाट ला पुष्कर कुंभ मेळावा 13 एप्रिल पासून सुरू आहे या मेळाव्यात प्रत्येक दिवशी जवळपास पंधरा ते वीस हजार भाविक दर्शन घेत असून सिरोंचा नगरपंचायत कडून अझादी का अमृत महोत्सव तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत स्वच्छ्ता मोहीम राबविली जात आहे सदर  मोहिमेमध्ये नगर पंचायत कार्यालयातर्फे आज  सायंकाळी  प्राणहिता नदी महिमेकरिता नगर पंचायत सिरोंचा कर्यालयाचे मुख्य  अधिकारी विशाल पाटील यांनी सिरोंचा शहरातील सर्व अधिकारी वर्गाला एकत्रित करून प्राणहिता  नदिघटावर स्वच्छ्ता मोहीम राबविली . सदर  मोहिमध्ये स्वच्छतेकडे  विशेष लक्ष देऊन व नागरिकांच्या मनात सफाई काम करणाऱ्या कमगारविषयी आणि ते करीत असलेल्या कामाविषयी  चांगली भावना निर्माण करण्यासाठी चक्क मुख्याधिकारी  विशाल पाटील व  आस्था जिल्हा व्यवस्थापन समितीचे अधिकारी असलेले कृष्णा रेड्डी  5 फूट खोल परिसरपर्यंत पाण्यात उतरून पाण्यातील कचरा बाहेर काढून प्राणहिता नदी किनारा पुष्कर यात्रे करिता  सुसज्ज केला सदर  सफाई मोहिमेदरम्यान  तहसीलदार शिकतोडे मुख्य अधिकारी विशाल पाटील नायब तहसीलदार सय्यद हमीद व पोलीस निरीक्षक जाधव  सुद्धा उपस्थित राहून मोलाचे योगदान दिले सादर मोहिमे मार्फत येणाऱ्या भाविकांना व  शहरातील नागरिकांना  स्वच्छतेविषयी एक मोठा संदेश अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आपला गाव स्वच्छ तर आपण स्वच्छ अशी एक भूमिका या अधिकाऱ्यांनी घेतली व जवळपास दोन तास प्रणिहिता नदीकाठावरील कचरा पूर्ण अधिकाऱ्यांनी जमा करून स्वच्छतेचा संदेश येणाऱ्या भाविकांना दिला या स्वच्छतेचे चर्चेचे प्रत्येक भाविकांच्या तोंडातून दिसू लागले तसेच शहरातील नागरिकांच्या तोंडातून एकच वाक्य ऐकायला  येऊ लागले की मुख्याधिकारी हवा तर असा...!!

Post a Comment

Previous Post Next Post